Saturday, May 4, 2024
Homeराजकारणशिवसैनिकांनी ‘या’ भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका उद्धव ठाकरेंचे आवाहन

शिवसैनिकांनी ‘या’ भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’वर दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. तसेच, जे आमदार माझ्या सोबत राहिले त्यांचे त्यांनी कौतुक केले.

माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे नि शिवसेनेचाच राहील. एका गोष्टीचा नक्की अभिमान होता आणि आहे, शिवसेनेने आज पर्यंत राजकीय पार्श्वभूमी आहे की नाही याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं. ज्यांना या साध्या माणसांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, मोठी झाली ती माणसं गेली. ज्यांनी यांना मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं आज ही शिवसेनेसोबत आहेत. ही जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही. अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. न्याय मंदिरावर विश्वास आहे. मला सर्वसामान्य लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत. मेसेज करून, फोन करून ते आपला पाठींबा दर्शवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय