Gold-Silver Rate : दिवाळीच्या हंगामात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती, पण सण संपताच सोनं स्वस्त झाल्याची चांगली बातमी ग्राहकांसाठी आली आहे. मागील आठवड्यात सोन्यात तब्बल 2,000 रुपयांची वाढ झाली होती, पण आता आठवड्याच्या सुरुवातीलाच या किमतींमध्ये घसरण दिसून येत आहे.
आज सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोनं 80,055 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,518 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोनं 78,204 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,923 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले आहेत.
चांदीत देखील किंमतीतील स्थिरता आहे. मागील आठवड्यात चांदीत 3,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदीचा भाव स्थिर आहे. आज एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीवर कोणतेही कर किंवा शुल्क लागू केले जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश असल्याने किंमतींमध्ये थोडा फरक दिसून येतो.
सोनं आणि चांदीच्या दरातील घसरणीमुळे आता ग्राहकांना पुन्हा एकदा सुवर्णसंधी मिळाली आहे.
Gold-Silver Rate
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर