Sunday, July 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदी एमआयटीत जागतिक बौद्धिक संपदा मार्गदर्शन कार्यशाळा

आळंदी एमआयटीत जागतिक बौद्धिक संपदा मार्गदर्शन कार्यशाळा

आळंदी/अर्जुन मेदनकर: येथील एम.आय.टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया मधील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने जागतिक बौद्धिक संपदा दिना निमित्त पेटंट कशा प्रकारे सादर करावे, मुलांनी नवीन शोधाचे आणि कल्पनांचे संरक्षण कसे करावे यावर एक दिवसीय कार्यशाळचे उत्साहात आयोजन केले.

या कार्यशाळेत प्रा. कुणाल सरपाल ( ट्रेडमार्क आणि; पेटंट अँटर्नी ) यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकार आणि बौद्धिक संपदा संरक्षण कसे करावे यावर आधारित अर्थपूर्ण मार्गदर्शन केले. बौद्धिक संपदा अधिकाराच्या क्षेत्रातील आगामी आव्हाने आणि संधींना सामोरे जाण्यासाठी व पेटंट मसुदा, पेटंट कसे दाखल करावे , पेटंट नोंदणीस आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे कोणती यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत सर्व महाविद्यालयीन शाखांतील विद्यार्थीनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे याच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.अक्षदा कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन स्टार्ट-अप अँड इनोव्हेशन सेलच्या प्रमुख आणि आयआयसी संयोजक प्रा.अभिजित नेटके यांनी केले. प्रा. पल्लवी बोंगाणे यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. प्रा. प्रिती भारंबे यांनी आभार मानले. डॉ. अमोल माने, डॉ अर्चना आहेर प्रा.आकांशा लांडगे, प्रा.संजय गुंजाळ, प्रा.वसंत करमड, प्रा.कविता महाजन यांनी ही कार्यशाळेच्या यशस्वीतेस परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय