Friday, November 22, 2024
Homeराज्यGhatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

Ghatkopar hoarding tragedy: मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

मुंबई : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील तब्बल 250 टन वजनाचं जाहिरातीचे महाकाय होर्डिंग्ज (hoarding) कोसळलं. त्यानंतर लोखंडी सांगाडा हटवताना अजून काही मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे. लोखंडी सांगाडा (steel structure) हटवण्याच्या कामाला वेग आला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर गेला असल्याची माहिती मिळत आहे. ghatkopar

या दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304, 338, 337, 34 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा इगो मीडियाचा संचालक कुटुंबासहित फरार आहे. लोखंडी सांगड्याखाली आणखी काही मृतदेह असण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. hoarding tragedy

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknathshinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून मृत्यंच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत जाहीर केले आहे. तसेच सरकारने राज्यभर होर्डिंग्ज तपासणीचे आदेश जारी केले आहेत. Mumbai

संबंधित लेख

लोकप्रिय