Sunday, May 19, 2024
Homeराज्यघरकुल संकुल ची वाटचाल सोलर सिटीकडे; वर्षाला ९ लाखाची बचत

घरकुल संकुल ची वाटचाल सोलर सिटीकडे; वर्षाला ९ लाखाची बचत

चिखली : पिंपरी चिंचवड मनपा घरकुल संकुल मध्ये सौर ऊर्जेचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे.

पिंपरीतील चिखली येथील आर्थिक दुर्बल घटकातील श्रमिकासाठी बांधलेल्या घरकुल संकुल या ठिकाणी पाच इमारतीमध्ये सौर उर्जेचा वापर सुरू झाला आहे, पाणी पुरवठा मोटर, लिफ्ट आणि सोसायटीचे सार्वजनिक लाईट सौर ऊर्जेवर चालतात. यामुळे प्रत्येक सोसायटीचे दरमहा १५ हजार रुपयांची बचत होत आहे.

पितांबरी कंपनीने सीएसआर फंडातून १७ लाख रुपये या प्रकल्पाला दिले. पुणे सहवास रोटरी क्लब आणि डेटम कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रीन पर्यावरण धोरणाला घरकूलवासीयांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद अतिशय उल्लेखनीय आहे. मनपा, केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने उभ्या केलेल्या घरकुल प्रकल्प संपूर्ण सौर उर्जेवर चालत आहे.

पितांबरी कंपणी चे CMD रविंद्र प्रभुदेसाई, सोलर डीव्हीजन हेड शमिंदर कुलकर्णी, CEO पुजारी, मिलिंद कडगावकर, तसेच रोटरी क्लबचे किरण इंगळे, प्रकाश अवचट, डेटम कंपनीचे संतोष जोशी, मेजर विचारे या तज्ञ मंडळींनी हा प्रकल्प कार्यान्वित केला.

देशातील हा पहिलाच प्रयोग आहे, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी सांगितले. घरकुल मधील सोलर सिस्टम बसवलेल्या बिल्डिंगला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी भेट देऊन सोलर सिस्टिम ची पाहणी केली.

यावेळी संजोग वाघेरे पाटील म्हणाले, की अशोक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल मध्ये सोलर सिस्टम चे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. तसेच या कामाची पावती म्हणून शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलर सिस्टम ची माहिती देण्यात येणार असून तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलर सिस्टम दाखवण्यासाठी घेऊन येण्याचे वचन शहराध्यक्षांनी दिले. यावेळी उर्वरित राहिलेल्या बिल्डिंगला ही सोलर सिस्टम बसवण्यासाठी मदत करण्याचे वचन वाघेरे पाटील यांनी दिले. 

यावेळी पिंपरी – चिंचवड जिल्हा सरचिटणीस अशोक मगर, मनिषाताई गटकळ, नागेश गवळी, सुरेश सांडुर, सुजाताताई विधाते, सविताताई मिडगुले, संतोष माळी, शांताराम खुडे, संभाजी गोरे , प्रेमा शेट्टी, सादीक शेख विनायक शेंडगे आदीसह घरकुल मधील नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय