Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवड...आता पुढच्या वर्षी लवकर या !

…आता पुढच्या वर्षी लवकर या !

पिंपरी चिंचवड : निर्बंधमुक्त वातावरणात या वर्षी घरोघरी गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील हजारो गृहसंकुले आणि छोट्या मंडळांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती.

घरोघरी गणेशाची आरती- पण निवडणुका लांबल्यामुळे संमिश्र उत्साह

दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. तशी तयारीदेखील घरोघरुईपाहायला मिळत आहे. कोरोना काळात अनेकांनी साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला. जिथे 5 ते 6 फुटांची गणेशमूर्ती होते, तिथे दीड-दोन फुटांच्या मूर्ती बसवल्या गेल्या. या वर्षी नागरिकांमध्ये उत्साह आहे.


कासारवाडी, पिंपरीत उत्साहाने स्वागत

कासारवाडी येथील निलेश पासलकर, अनिल शिंदे, मीरा पावसकर यांनी सांगितले की, कोरोना काळातील भीती आता निघून गेली आहे. सामूहिक आरतीचा आनंद आता सर्वजण घेत आहेत.

पुजा साहित्या मध्ये दुर्वांच्या जुड्या, संकल्प पर्यावरण रक्षणाचा

यावर्षी महानगरपालिकेने ठिकठिकाणी निर्माल्य कुंडे ठेवून परिसर स्वछता प्रबोधन केल्यामुळे घरातील फळे, फुले आणि निर्माल्य विल्हेवाट व्यवस्थापन उल्लेखनीय ठरले आहे.

अरविंद पाटील,शंकर कुलकर्णी, रविंद्र काळे, सदाशिव गुरव यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने विसर्जन घाटावर केलेली व्यवस्था आणि कृत्रिम हौद यामुळे पवना,इंद्रायणी नद्यांचे जलप्रदूषण होणार नाही.लोकसहभागातून स्वछता अभियान प्रत्येक उत्सवात निरंतर सुरू राहील.



समाजात भक्तीतून सामाजिक एकता जागी करणारा उत्सव

चिंचवडगाव, आकुर्डी, त्रिवेणीनगर, देहूरोड सह विविध श्रमिकांच्या निवासीक्षेत्रात सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षी निधीची कमतरता जाणवत होती. महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर इच्छुकांचा उत्साह जाणवला नाही.14 मार्च पासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. राज्यातील सरकार बदलले तरी निवडणुका कधी होतील याचा कोणालाही अंदाज नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याचा उत्साह मावळलेला हा गणेशोत्सव सर्वत्र पाहायला मिळाला. त्यामुळे घरोघरी गणेश उत्सवाची मोठी लगबग दिसत होती.

भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक लांडगे म्हणाले की, माध्यमक्रांतीमुळे सर्व धार्मिक आणि सांकृतिक उत्सव ऑनलाईन साजरे होत आहेत. गणेशोत्सव हा वस्ती वस्तीत लोकांना एकत्र आणणारा एकमेव राष्ट्रीय उत्सव आहे, त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत आहे, याची खंत वाटते.

देहूरोड येथील जेष्ठ नागरिक जगन्नाथ महाले म्हणाले की, गणेशोत्सवासाठी सजावट सामान,फळे,मूर्ती इत्यादी खरेदी वाढत असल्याने बाजारपेठ सजली.बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.दोन वर्षानंतर प्रथमच पूजा साहित्य विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.फुलउत्पादक शेतकऱ्यांना हा उत्सव आर्थिक बळ देणारा ठरला आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय