Saturday, May 4, 2024
HomeNewsकुत्र्याने घेतला एका डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टचा चावा !

कुत्र्याने घेतला एका डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टचा चावा !

मुंबई: पनवेलच्या एक सोसायटीतल्या लिफ्टमध्ये जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याने एका डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. डिलिव्हीर बॉय जेवण घेऊन लिफ्टमधून बाहेर पडत असताना एका पाळीव कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला.

गेल्या काही दिवसांपासून पाळीव कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याचवेळी समोर जर्मन शेफर्ड कुत्रा त्याला दिसला. त्याला पाहून सुरुवातीला डिलिव्हरी बॉय दचकला. पण कुत्र्याच्या मालकाने त्याला काहीसं दूर केल्यानंतर डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडला. पण तितक्यात कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला, आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या पनवेल इथली आहे. डिलिव्हरी बॉयचं नाव नरेंद्र पेरियार असं असून त्याला नवी मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय