Sunday, July 14, 2024
Homeआंतरराष्ट्रीयगूगल ने गामा पैलवानांना वाहिली अनोखी आदरांजली !

गूगल ने गामा पैलवानांना वाहिली अनोखी आदरांजली !

गूगलच्या होम पेज वर आज भारतीय कुस्तीवीर गुलाम मोहम्मद बक्श बट यांना समर्पित गूगल डूडल झळकत आहे. 20व्या शतकातील हे भारतीय पेहलवान  गामा पहिलवान या नावाने ओळखले जात आहे. वृंदा झवेरी यांनी हे गूगल डूडल साकारलं आहे. गुलाम मोहम्मद बक्श बट हे सर्व काळातील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटूंपैकी एक मानले जात होते आणि त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपराजित राहिल्यानंतर त्यांना ‘द ग्रेट गामा’ हे नाव मिळाले.

भारतभूमीने नेहमीच महान “कुस्तीवीर” निर्माण केले, त्यातीलच एक अनभिषिक्त मल्ल म्हणजे “गामा पेहलवान”. गामा हे त्याचे कुस्ती मैदानातील नाव, खरे नाव गुलाम महोम्मद बक्ष. अमृतसर, पंजाब (ब्रिटिश इंडिया) मध्ये २२ मे १८७८ मध्ये जन्मलेला गुलाम हा काश्मिरी मुस्लिम होता. त्याने वयाच्या १०व्या वर्षांपासूनच कुस्ती खेळायला सुरुवात केली. दगडी डंबेल्स वापरून त्यांनी शरीरयष्टी कमावली. कुस्तीचा वारसा त्यांना आजोळ घराण्याकडून मिळाला, गुलामचे वडील ते अगदी लहान असताना वारले आणि त्यांची जबाबदारी घेतली, आईच्या वडील आणि भावाने, दोघेही पेहलवान होते. त्यांच्या तालमीत गुलाम कुस्ती शिकू लागले.

एका वेळी ४० – ४० लोकांशी कुस्ती खेळून ते जिंकत असत. त्यांचा दररोजचा सराव गजब होता, १०० किलो वजन अंगावर घेऊन ते ५ हजार दंड बैठका काढत असत. अशी भन्नाट कसरत म्हणजे खुराक सुद्धा तसाच असणार, तुमचा विश्वास बसणार नाही असं खास डाएट होतं गामा पेहलवना ह्यांचं. १० लिटर दुध ३ टोपली भरून फळं, दीड पौंड बदामाचे सरबत, अर्धा लिटर तूप, ६ पौंड लोणी, हे आणि अजून पौष्टिक खाद्य ते रोज फस्त करत असत. त्यांची उंची सुमारे ५.८” तर वजन तब्बल ११० किलो होते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त युवा धम्म अभ्यासक प्रथमेश देसाई यांचे तरुणांना मार्गदर्शन !

कांदा 50 पैसे प्रति किलो ; शेतकऱ्याचे अश्रू अनावर !

मोठी बातमी : सर्वसामान्यांना दिलासा, घरगुती गॅस सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी होणार स्वस्त

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय