पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी आढळराव पाटील यांनी म्हाडा पुणे मंडळाचा सभापती पदाचा पदभार स्वीकारला.
म्हाडाच्या अध्यक्षांचा पदभार स्वीकारल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारीबाबतचा निर्णय हे महायुतीतील तीनही प्रमुख घटक पक्षांचे नेते चर्चा करून घेतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याच पक्षाच्या व्यक्तीला महायुतीची उमेदवारी मिळेल. २०१९ मध्ये शिरूरमधून दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळालेली आहेत.
मी कधीही खासदारकीच्या उमेदवारीसाठी काम करत नाही. मला शिरूर लोकसभेची महायुतीची उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीचे काम करणार आहे. असेही ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आदी उपस्थित होते.
तसेच, शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार नसल्याने म्हाडा पुणे मंडळाचा सभापती करण्यात आल्याच्या चर्चेत तथ्य नाही. नसल्याचे आढळराव यांनी स्पष्ट केले. तसेच, हा विषय गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता, असेही ते म्हणाले.
दरम्यान, म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल, असा विश्वास उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
मोठी बातमी : शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवे चिन्ह, ‘या’ चिन्हावर लढणार निवडणूक
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन
Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती