Tuesday, May 7, 2024
HomeNewsशमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने निराधार लोकांना अन्नदान.

शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने निराधार लोकांना अन्नदान.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सामाजिक संस्था शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्रा मधे वास्तव्यास असलेल्या निराधार व्यक्तींना अन्नदान करण्यात आले. शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम संपन्न झाला.सावली निवारा केंद्र येथे गरीब निराधार व्यक्ती स्त्री पुरुष मुले वास्तव्यास आहेत.

या सावली निवारा केंद्रात त्यांचे संगोपन व पुनर्वसन करण्यात येते. या सावली निवारा केंद्रात या निराधार लोकांची राहण्याची, जेवण्याची, तसेच औषध पाण्याची सुविधा देण्यात येतात. ज्या व्यक्ती समाजाला कंटाळलेली आहेत,काही आपले घर सोडून आलेले आहे तर काहींना घरातुन हाकलून दिलेली आहे. ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांना सावली निवारा केंद्रात आधार दिला जातो. अशा कार्य करणार्या संस्थेला एक मदितीचा हात म्हणून शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीनं येथील निराधार लोकांना अन्न दान करण्यात आले.शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाऊंडेशन ही एक सामाजिक संस्था असून या संस्थे अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेल्या जातात. या संस्थेने वेलकम स्कुल मारूंजी या नावाने शाळा सुरू केली असुन उत्तम प्रकारे शालेय शिक्षणाचे नियोजन या शाळेत केली जातात. त्याच प्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

सदर कार्यक्रम प्रसंगी शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्षा शबनम सय्यद, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अकबर मुल्ला, फाऊंडेशन संचालक साहूल उर्फ हमीद शेख, रशीद सय्यद, कलिंदर शेख, रेहान हुसेन, फरदिन सय्यद, जाकिर खान आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न दान कार्यक्रम वेळी सावली निवारा केंद्रातील अधिकारी व स्टाप उपस्थित होते. यावो सर्व उपस्थितांचे आभार साहूल उर्फ हमीद शेख यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय