Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

Petrol diesel : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट करण्याची घोषणा करत त्यांनी जनतेच्या हिताचे पाऊल उचलले आहे. अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. (Petrol diesel)

पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे वरुन २५ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. 

यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे ६५ पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे २ रुपये ७ पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा Petrol diesel Price

या निर्णयामुळे राज्यातील वाहतूकदार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या घटेमुळे महागाईच्या दबावातून थोडी मोकळीक मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख

लोकप्रिय