Saturday, May 18, 2024
Homeक्राईमफटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; २३ कामगारांचा होरपळून मृत्यू

थायलंड मधील सुफान बुरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात बुधवारी (१७ जानेवारी) दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. याशिवाय काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामुळे कारखान्यातील अनेक भागात भीषण आग लागली होती. आग विझवताना अग्निशमन दलाला मोठे परिश्रम घ्यावे लागले. अद्यापही आग धुमसत असून बचावपथकाला अडथळे येत आहेत.



मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून मृतदेह शोधण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. सध्या बचावपथकाकडून युद्धपातळीवर मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बँकॉकपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपाहान प्रांतात घडली. हा किनारी भाग असून येथे फटाक्यांचे अनेक कारखाने आहेत. यातील बहुतांश कारखाने जुने आहेत.हा दाट लोकवस्तीचा परिसर असल्याने आजूबाजूच्या भागातील लोक या कारखान्यांमध्ये काम करतात.Fierce explosion in crackers factory; 23 workers died in the runaway

बुधवारी दुपारच्या सुमारास या कारखान्यात अनेक मजूर काम करीत होते. त्याचवेळी कारखान्यात अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला.स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की क्षणार्धात परिसरात धुराचे मोठ-मोठे लोळ पसरले होते. या घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय