Monday, May 6, 2024
Homeग्रामीणप्रसिद्ध वेशभूषाकार आणि पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानु अथय्या निधन

प्रसिद्ध वेशभूषाकार आणि पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानु अथय्या निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार आणि पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानु अथय्या यांचे काल दु:खद निधन झाले.

भानु अथय्या यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी झाला. त्यांना १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ चित्रपटासाठी त्यांनी केलेल्या कामासाठी ऑस्कर मिळाला होता. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन रिचर्ड अटेंबोरो यांनी केले होते. अकादमीच्या एका कार्यक्रमात असे विधान केले होते की “माझ्या स्वप्नातलं चित्रपट असलेल्या ‘गांधी’ साठी जवळजवळ १७ वर्षे मी जुळवाजुळव करत होतो. पण भानु अथय्या सगळ्यात योग्य निवड आहेत, हे सुचायला फक्त १५ मिनिटं लागली”

मूळच्या कोल्हापूर येथील असलेल्या भानु यांनी गुरुदत्त दिग्दर्शित १९५६ च्या सुपरहिट ‘सीआईडी’ चित्रपटापासून वेशभूषाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांना २ राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले. एक गुलजार च्या ‘लेकीन’ व दुसरा आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’ साठी हे पुरस्कार मिळाले. त्यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित ‘आंबेडकर’ मध्ये सुद्धा वेषभूषाकार म्हणून काम केले आहे.

त्यांनी २०१२ मध्ये त्यांचे ऑस्कर पदक ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस’ ला सुरक्षित ठेवीसाठी परत केले. भारताचे नाव गाजवणाऱ्या अशा या  महान कलाकाराला महाराष्ट्र जनभूमी आदरांजली व्यक्त करत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय