Friday, May 3, 2024
Homeजिल्हामनसे शहर प्रमुखाच्या हत्येने परिसरात खळबळ

मनसे शहर प्रमुखाच्या हत्येने परिसरात खळबळ

परभणी : परभणीमध्ये मनसे शहर प्रमुखाची हत्या (Parbhani Murder) करण्यात आली आहे. परभणीतील मनसे शहर प्रमुख सचिन पाटील (Sachin Patil) यांचा खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांची किरकोळ वादातून हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येची ही थरारक घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हत्ये प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेतल्याची किंवा अटक करण्यात आल्याची माहिती नाही. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सचिन यांच्या हत्येनं त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तरुण मुलगा गमावल्यानं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सचिन पाटील यांची हत्या किरकोळ वादातून झाली की आणखी काही वाद होता, याचाही तपास पोलिसांकडून केला जातो आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय