Saturday, April 20, 2024
Homeराजकारणशिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यावर बंद दाराआड काय चर्चा झाली, अमित शहा...

शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यावर बंद दाराआड काय चर्चा झाली, अमित शहा यांनी सांगितले

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका मिशन १५० ची घोषणा देत महानगरपालिकेसाठी निवडणूकीची रणनीती ठरवली. या बैठकीत शहा यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलताना २०१४ मध्ये शिवसेनेसोबतची युती तुटल्यापासूनचा घटनाक्रमही सांगितला. तसेच शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यावर शहा म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या, असा घणाघाती आरोप शहा यांनी केला.

अमित शहा म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एकदा रात्री दोन वाजेच्या सुमारास मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यावेळी लोकसभा, विधानसभेची युतीची बोलणी एकत्रितच करा आणि आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्या असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत, असे फडणवीस माझ्याशी बोलले. मात्र, मी त्यांना मुख्यमंत्रिपद त्यांना मिळणार नाही असे बजावून सांगितले. तरीही आपल्या केंद्रीय नेतृत्वाशी त्यांना बोलून घ्यायला सांगा, असे मी फडणवीसांना सांगितले. त्यानुसार उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींशी बोलले त्यानुसार पाचही वर्षे भाजपकडेच मुख्यमंत्रिपद राहील, असे ठरले असल्याचे शहा यांनी सांगितले. बंद दाराआड आमचे काहीही ठरलेले नव्हते, आमचे जे काही असते ते सगळे उघड; सार्वजनिक असते, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय