Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्रत्येक एसटी स्टँड मध्ये रिक्षा स्टॅन्ड ला जागा हवी : बाबा कांबळे

प्रत्येक एसटी स्टँड मध्ये रिक्षा स्टॅन्ड ला जागा हवी : बाबा कांबळे

शिरूर एसटी स्टँड येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न रिक्षा स्टँड फलकाचे अनावरण

रिक्षा चालकांचे प्रश्न घरकुल आरोग्य या प्रश्नांवरती सहकार्य करू नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांच्या आश्वासन

पुणे :
महाराष्ट्रात प्रत्येक विभागामध्ये, नवीन आधुनिक पद्धतीने एसटी स्टँडचे बांधकाम सुरू असून, महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाने बांधा हस्तांतरित करा B.O.T तत्वावर सर्व विशिष्टांचा विकास करण्यास सुरुवात केली असून, या सर्व प्रक्रियेमध्ये मात्र रिक्षा चालकांना गृहीत धरण्यात आले नसून गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक रिक्षा स्टॅन्ड मध्ये रिक्षा चालक आपल्या रिक्षा लावून एसटी मधून उतरणाऱ्या प्रवाशांना घरापर्यंत सेवा देतात, ही सेवा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी एसटीचे नवीन बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी रिक्षा स्टँड साठी आधुनिक पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्ट कर यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. पुणे शिरूर येथील एसटी स्टँड समोर महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न रिक्षा स्टँड फलकाच्या अनावर नुकत्याच करण्यात आले यावेळी झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

यावेळी शिरूर नगरपरिषदेचे नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , शिव, सेवा मंडळ ट्रस्ट अध्यक्ष मनसुखलाल गुगळे, पुणे जिल्हा अध्यक्ष जनता दल ,संजय बारवकर, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण गायकवाड, वाहतूक विभागाचे वाघमोडे ,बाळासाहेब ढवळे, महाराष्ट्र रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख मोहम्मद भाई शेख, पुणे शहर अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष मुराद काजी, उपाध्यक्ष अरशद अन्सारी ,कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील ,पुणे शहर संघटक मोसिन शेख ,हडपसर अध्यक्ष निशांत भोंडवे ,मध्यवर्ती अध्यक्ष अँथोनी अण्णा उपस्थित होते. यावेळी मुजफ्फर कुरेशी म्हणाले, शिरूर येथे आधुनिक पद्धतीने एसटी स्टँडचे काम सुरू आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांना अधिकृतपणे रिक्षा थांबा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच रिक्षा चालकांसाठी आरोग्य सुविधा, त्यांना स्वस्तात घर व इतरही योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी स्टँड अध्यक्ष प्रकाश लोंढे उपाध्यक्ष आकिल शाह, खजिनदार वसीम शेख ,उपखजिनदार महेश धुमाळ, सचिवनागेश भोसले ,उपसचिव विलास शेंडगे, कार्याध्यक्ष राजू गायकवाड, उपकार्याध्यक्ष मोहसिन तांबोळी चिटणीस विजय घावटे उपचिटणीस चंद्रकांत घोडके स्टॅन्ड प्रमुख जावेद खान ,उप स्टॅन्ड प्रमुख लखन करडे सल्लागार भाऊसाहेब शेजवळ ,सल्लागार सुभाष ढवळे, सल्लागार संजय भाऊ बारवकर, यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय