बारामती :(क्रांतिवीर रत्नदीप) तांदुळवाडी येथील धम्म ज्योती बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कमिटीची स्थापना झाली. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. या कार्यक्रमास तांदुळवाडी येथील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बारामतीतच नव्हे संपूर्ण पंचक्रोशी मध्ये तांदुळवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जयंतीच्या कमिटीची स्थापना करण्यात आली यावेळी युवा कार्यकर्त्यांना विविध पदांचे वाटप करण्यात आले.
अध्यक्ष सुरज अशोक सरोदे ,उपाध्यक्ष गौतम हनुमंत सरोदे, सुनील राजेंद्र पानसरे ,खजिनदार ऋषिकेश भोसले, सहखजिनदार तुषार दादासो सरोदे ,सचिव हर्ष नवनाथ सरोदे, दर्शन सरोदे ,सहसचिव बबलू शिंदे ,कार्याध्यक्ष करण पानसरे, जीवन सरोदे, सहकार्याध्यक्ष देविदास बाळासो सरोदे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस सरोदे व व्यवस्थापन ॲड योगेश सरोदे ,भीमराव सरोदे यांनी केले. यावेळी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.