पुणे/क्रांतिकुमार कडुलकर: खाजगी उद्योगातील निवृत्त कामगारांना पूर्ण पगारावर पेन्शन मिळावे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने एक एप्रिल 2019 रोजी दिला होता. त्यानंतर 16 एप्रिल 2019 रोजी टाटा मोटर्स मधील कामगारांना ते मिळू नये,या एकमेव उद्देशाने त्या वेळच्या युनियन व पी एफ ट्रस्टींना हाताशी धरून कंपनी आणि ट्रस्टने सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप अर्ज (interlocutory/intervention application) no.64742 in wpc no 118 of 2018 दाखल केला होता.
खरे वास्तविक “आम्हाला पूर्ण पगारावर पेन्शन देण्यात यावे” यासाठी टाटा मोटर्स मधील एकही कामगार अथवा एकही स्टाफ मधील ऑफिसर कोर्टात गेला नव्हता.इतकेच काय तर पुणे, ठाणे ,मुंबई, लखनऊ,जमशेदपूर व इतर प्लांट मधील युनियनने पूर्ण पगारावर पेन्शन मिळावे यासाठी कोणत्याही कोर्टात अर्ज केला नव्हता. तरीही ते मिळू नये या उद्देशाने कंपनी व ट्रस्ट सुप्रीम कोर्टात गेली.या केसचा निकाल 4 नोव्हेंबर 2022 रोजी पेन्शनर्सच्या बाजूने लागला.
टाटा मोटोर्सचे हजारो निवृत्त कामगार आज तुटपुंजी पेन्शन घेत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पीएफ चे योगदान ट्रस्ट कडे असलेल्या टाटा मोटर्सचे कामगार वाढीव पेन्शन मिळावे यासाठी गेली पाच वर्षे आशेवर आहेत.खाजगी उद्योगातील कामगारांना हक्काची पेन्शन मिळावी याबाबत 2014 मध्ये केरळ हायकोर्टाने निवृत्त कामगारांच्या बाजूने निकाल दिला होता.या निकालावर सुप्रीम कोर्टाने अलीकडे शिक्का मोर्तब केल्यानंतर टाटा मोटोर्सचा पी एफ ट्रस्ट निवृत्त कामगारांना दिलासा देईल याची प्रतीक्षा कामगार करत आहेत.
पुणे,पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातील निवृत्त कामगारांच्या बैठका घेऊन या निकालाची माहिती प्रशांत पोमण,विद्याधर बावडेकर व त्यांचे सहकारी वेळोवेळी कामगारांना मार्गदर्शन करत आहेत.या निकालानुसार विद्याधर बावडेकर,माजी अध्यक्ष ‘टेल्को कामगार संघटना’ यांनी “पूर्ण पगारावर पेन्शन” मिळावे यासाठी 11 जानेवारी 2023 रोजी टेल्को एम्प्लॉईज पेन्शन ट्रस्टकडे तसेच श्रम मंत्रालय दिल्ली येथेअर्ज केला.
दुःखदायक बाब म्हणजे बावडेकर यांच्या या अर्जाची कोणतीही दखल टेल्को एम्प्लॉईज पेन्शन ट्रस्टने घेतली नाही. परंतु श्रम मंत्रालय दिल्ली यांनी या अर्जाची दखल घेतली व 24 जानेवारी 2023 रोजी नोडल ऑफिसर पब्लिक ग्रिवेंसेस ईपीएफओ हेड ऑफिस यांना त्यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्याधर बावडेकर यांनी कंपनीला 8 जानेवारी 2023 रोजी याबाबत REMINDER पाठवले आहे. अशी माहिती प्रशांत पोमण माजी प्रतिनिधी प्रशांत पोमणटाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुणे. Committee for better future of Tata Motors separated employees and successors,Puneयांनी माध्यमाना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.