सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या (Surendra Pathare Foundation) भक्तिमय संगीत कार्यक्रमाने घेतला मनाचा ठाव
विमाननगर, पुणे: ‘ज्ञानोबांच्या ओंजळीत दोन मोगऱ्याची फुलं पडली आणि ज्ञानोबा म्हणाले, “आजे, आपण लावलेला मोगरा फुलला बहरला… ही मोगऱ्याची फुले आता विठ्ठलाला वाहायला नकोत… ही फुलं मी विठ्ठलाला घेऊन निघालोय. त्या गर्दीतून आजी मागे लोटली गेली, शिळा लोटली गेली. माऊलींनी डोळे बंद केले आणि जगासाठी पसायदान मागणारी माऊली समाधीस्त झाली’, अशा शब्दांत व्याख्याते व प्रबोधनकार गणेश शिंदे यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे चरित्राच्या मांडलेल्या वर्णनाने उपस्थित नागरिकांच्या मनाचा ठाव घेतला.
‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’च्या वतीने (Surendra Pathare Foundation) आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर व संतसाहित्यावर आधारित ‘मोगरा फुलला’ या भक्तिमय संगीत कार्यक्रम (ता. २५ जुलै) संपन्न झाला. व्याख्याते तसेच स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार गणेश शिंदे व गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांच्या सुमधुर अभंगवाणीतून साकारलेला हा कार्यक्रम नागरिकांसाठी खऱ्या अर्थी पर्वणी ठरला. सलग दोन दिवस (ता. २४ व २५ जुलै) विमाननगर येथील सिम्बायोसिस ऑडिटोरियम येथे हा कार्यक्रम होता.
“आज आपल्या पुढच्या पिढीला जर चांगल्या संस्करांची शिदोरी द्यायची असेल, तर संतसाहित्याशिवाय पर्याय नाही. संतसाहित्य अभ्यासण्याची व अनुभवण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच, या कार्यक्रमाचे प्रयोजन केले होते. दोन्ही सादरकर्त्यांच्या प्रासादिक व रसाळ वाणीने तसेच वाद्यवृंदांच्या साथीने अक्षरश: ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्यासोबत सगळीच संतमंडळी डोळ्यांसमोर उभे राहिली”, असे सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी यावेळी सांगितले.
गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांनी गायलेल्या मोगरा फुलला, आळंदी हे गाव, अबीर गुलाल, बोलावा विठ्ठल, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, लगिन देवाचं लागतं, पंढरीला नेलं गं बया, रोडगा वाहीन तुला, देव बाजारचा भाजीपाला नाही रे आदि अभंग, भक्तिगीते व भावगीतांनी उपस्थित नागरिक भारावून गेले.
वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे हेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. नागरिकांच्या तुडुंब गर्दीने सभागृह पूर्ण भरले होते. पसायदानाने या भक्तिमय संगीत कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा :
मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत