Sunday, May 19, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : एलॉन मस्क यांची मोठा निर्णय, ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवला ?

ब्रेकिंग : एलॉन मस्क यांची मोठा निर्णय, ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवला ?

ट्विटर : ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) हे कायमच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत असतात. ते ज्या पद्धतीने निर्णय घेतात त्याची ही चर्चा जोरदार होत असते. आता पुन्हा त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवला आहे. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. हा नवा बदल पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणाऱ्या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचं चित्र दिसत आहे. ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हा डॉज (Doge) इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात आलं होतं. हा बदल फक्त वेब पेजवर बघायला मिळत आहे. मात्र मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, “ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे.”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय