Wednesday, January 15, 2025
HomeNewsमहाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नारायण...

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नारायण शिंदे यांची निवड

जुन्नर / आनंद कांबळे : विद्या विकास विद्यालय, सहकारनगर, पुणे येथे महासंघ पुणे जिल्हा शाखेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा कार्यकारिणी, पुणे शहर कार्यकारिणी, इंदापूर – बारामती तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. 

तसेच दौंड तालुका कार्यकारिणी, मावळ तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली होती. या निवड झालेल्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच तालुका / शहर / जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांना महासंघाचे राज्याध्यक्ष . कां. रं. तुंगार, महासंघाचे मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, पुणे मनपा शिक्षक संघाचे नेते तसेच राज्यातील सर्व मनपा / नपा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सचिन डिंबळे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, राज्य सहसचिव  विकास थिटे, पुणे विभाग उपाध्यक्ष शेखर उंडे, नगर जिल्हा सचिव विठ्ठल उरमोडे, पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, पुणे जिल्हा सचिव  जितेंद्र पायगुडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण दुधाट तसेच अन्य सर्वच पदाधिकारी / सभासद यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र व त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील दौंड, मावळ, इंदापूर तालुक्यातील कार्यकारिणीचे पदाधिकारी / सभासद उपस्थित होते. कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

■ पुणे जिल्हा नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे :

अध्यक्षपदी नारायण शिंदे, सचिवपदी जितेंद्र पायगुडे, कोषाध्यक्षपदी विकास मोरे, लक्ष्मण दुधाट, तर उपाध्यक्षपदी दिपक भोसले, संभाजी थोरात, शशिकांत किंद्रे, अर्जुन रावते, सहसचिवपदी संजय कुलाळ, उत्तम कांगुणे, राज्य प्रतिनिधीपदी अतुल यादव, सल्लागारपदी संजय घोडके,तर हिशोब तपासणीस सुदाम करंजावणे, प्रसिद्धी प्रमुख – सोपान बंदावणे, सहकोषाध्यक्ष – प्रकाश राऊत, महिला प्रमुख – रसिका परब, मुख्याध्यापक सेल प्रमुख संगीता अंत्रे, शिक्षकेतर प्रमुख मनोज जाधव, संघटनमंत्री – गणेश बारवे, प्रवक्ते  दिपक वळसे – पाटील, कार्यकारिणी सदस्य – दत्तात्रय चव्हाण, ज्योती भिलारे, वैशाली शिंदे,ज्योती पासलकर, विकास गवते,  वैशाली शिंदे, नीलिमा लांजेवार, सावळाराम कांबळे, मुख्याध्यापक सेल – शोभा खाटपे, संजीवनी वंजारे, लक्ष्मण मुळे, अजिनाथ चव्हाण, संगीता सोनकांबळे, श्रीमती हेमलता कदम, शीतल इंगुळकर, अनिल खिलारे, सुरेखा कोलते, श्रीमती वंदना पठारे, शिक्षकेतर सेल मारुती माळवदकर, मोहन शिंदे, अनिल बंब तसेच सर्व तालुका कार्यकारिणी चे अध्यक्ष व सचिव हे पदसिद्ध सदस्य आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय