Friday, May 10, 2024
Homeग्रामीणएसटीचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी जुन्नर शहरात देवराम लांडे यांचे आंदोलन

एसटीचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी जुन्नर शहरात देवराम लांडे यांचे आंदोलन

जुन्नर : एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ४५ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. बस सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होत असल्याने आज जुन्नर शहरात आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कचेरी पर्यंत रॅली काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी लालपरी ही जनसामान्यांची रक्तवाहिनी आहे, एसटी बंद असल्याचा सर्वात जास्त तोटा हा सर्वसामान्य नागरिकांना बसत असून एसटी वाहतूक बंद आहे मग आम्हाला बैलगाडीने विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी परवानगी द्या अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

आदिवासी भागातील जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना आरोग्य तपासणीसाठी जुन्नर शहरात यावे लागते, तसेच, या विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालय जुन्नर शहरात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्यामुळे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सरपंच अमोल लांडे, सरपंच पोपट रावते, निलेश रावते, सोमा बुळे, ज्ञानेश्वर विरणक, मारुती कोकणे, नावजी घोइरत, मंगेश गायकवाड यांसह अन्य शेकडो आंदोलक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय