भीमाशंकर अभयारण्य लगतच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राबाबत म्हणजेच इको सेन्सिटिव्ह झोन बाबत जुन्नर मध्ये वनविभागाची पत्रकार परिषद
जुन्नर : भीमाशंकर अभयारण्य लगतच्या पर्यावरण क्षेत्रामध्ये शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर केले आहे. याविषयी आदिवासी बांधवां मध्ये अनेक गैरसमज पसरले आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन मुळे कोणत्याही प्रकारे आदिवासी बांधवांचा हक्क बाधित होणार नसून त्यांच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे गदा येणार नाही, अशी माहिती जुन्नर वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
जुन्नर येथील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या वन संकुलात झालेल्या पत्रकार परिषदेत वनक्षेत्रपाल अजित शिंदे, चाकणचे वनक्षेत्रपाल योगेश महाजन, शंकर कवटे तसेच वनकर्मचारी उपस्थित होते
आदिवासी बांधवांचे हक्क अबाधित राहणार असून त्यांना इकोसेन्सिटिव्ह भागामध्ये कशाप्रकारे राहता येईल, मूळ व्यवसाय करता येईल का, वनौषधी गोळा करता येईल का, तसेच खाजगी क्षेत्रात शेती करता येईल का, याबाबत जयरामे गौडा,यांनी पत्रकार परिषद घेऊ माहिती दिली.