Home ताज्या बातम्या Earthquake in Marathwada : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Marathwada : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Marathwada Earthquake shocks in Nanded area, fear among citizens

Earthquake in Marathwada : नांदेड (Nanded) जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याची बातमी समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांदरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

मराठवाड्यातील नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), हिंगोलीमध्ये (Hingoli) यासोबतच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव, मुखेडसह अनेक ठिकाणी धक्के जाणवले. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. काही गावात भिंतीना तडे गेल्याची माहिती आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटर असून या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. Earthquake in Marathwada

तसेच, या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसान झालेलं नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यातही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Exit mobile version