नागपूर : रेल्वे खाजगीकरण, बेरोजगारीच्या विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डीवायएफआय ) च्या नागपूर जिल्हा कमिटीच्या वतीने येथील सुभाष रोड, खंडोबा मंदिर समोर मुक निदर्शने करण्यात आली.
डीवायएफआय’ने म्हटले आहे की, देशात ४० टक्के रोजगराचा वाटा उचलणारी भारतीय रेल्वेचे खाजगीकरणासाठी मोदी सरकारने १०५ रेल्वे मार्गावर १५१ खाजगी रेल्व गाड्या चालवण्यासाठी देशी विदेशी खाजगी कंपन्यांना आमंत्रीत केले आहे. यापुर्वीच सरकारने रेल्वे इंजिन व बोगीचे, इलेक्ट्रीकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतुक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गंतवणुकीला मुभा दिली आहे. आता ‘क’ व ‘ड’ गटाच्या रिक्त असलेली ५० टक्के पदे रद्द करण्याचा व नविन पदेनिर्मितीवर प्रतिबंध करण्याच्या निर्णय मुक निर्दशने करण्यात आल्याची जिल्हा सचिव कुणाल सावंत यांनी सांगितले.
रेल्वेची निर्मिती मुख्यतः मालवाहतुकीसाठी करण्यात आली होती. प्रवासी वाहतुक ही त्याकाळी नफे मिळवण्यासाठी नव्हती. पण मागे अनेक वर्षात मालवाहतुकिला चालना देण्याऐवजी तिच्यात घट झाली. पर्यायाने आज प्रवासी वाहतुकीतूनच नफे उपटण्याचे धोरण मागील काही वर्षात केंद्र सरकार ने अवलंबले आहे त्याच फटका सामान्य जनतेला बसुन रेल्वेवर श्रीमंताची मक्तेदारी प्रस्थापित करण्यात येत आहे, असे डीवायएफआयने म्हटले आहे.
या निदर्शनात संघटनेचे सचिव कृणाल सावंत, अध्यक्ष भारत अडकणे, मिलींद चौरे, राहुल जागेश्वर, चंद्रकांत बन्सोड, विजय फुलकर, ईशान नागेशवर, अभय पिंपलगावकर, मयुर तिरपुडे, रूपेश गुमगांवकर, सागर वैशाली केडीयार आदीसह सहभागी झाले होते.