Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्या'DYFI'ची मागणी; लाचखोर कृषी अधिकाऱ्यावर लुचपत प्रतिबंधात्मक कायदा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा...

‘DYFI’ची मागणी; लाचखोर कृषी अधिकाऱ्यावर लुचपत प्रतिबंधात्मक कायदा आणि अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा.

सुरगाणा : पंचायत समिती योजनतेलील लाभार्थीकडून पंधरा हजार रुपये लाच घेतल्याचे उघड झाले आहे.कृषी अधिकरी याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

पंचायत समिती येथील विशेष योजने अंतर्गत कार्यरत असलेले कृषी अधिकारी मगरयांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी लाच रोख रक्कम घेऊन आदिवासी माणसाची आर्थिक पिळवणूक केली आहे. निवड झालेल्या एक व्यक्ती मुरलीधर गावित याना अडीच लाख रुपये मंजूर झाले होते.या रुपयाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी तीन वेळा लाच घेतली.शेवटचे पाच हजार रुपये ७ जुलै रोजी मागताना खोबळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मोनिका पवार उपसरपंच पांडुरंग गायकवाड यांनी रंगे हात पकडले.त्यांना सुरगाणा पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यात आले.

योजनेचा लाभ घेण्याची आदिवासींना अक्कल नाही.असा जातीवाचक उल्लेख करणाऱ्या मगर यांच्यावर अट्रोसिटी दाखल करण्यात यावा. अशी मागणी DYFI च्या वतीने करण्यात आली आहे.योग्य ती कार्यवाही केली नाही तर येत्या १३ जुलै ला DYFI सुरगाणा तालुका कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे.निवेदन देण्यासाठी संघटनेचे सचिव पांडुरंग गायकवाड, मोनिका पवार,नितीन पवार, मोहन गावित,भारती चौधरी, कमलाकर कानोजे याच्या स्वाक्षरी असलेले निवेदन पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय