Saturday, May 18, 2024
Homeराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

मुंबई : एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेतून बंडखोरी आणि भाजप सोबत सत्ता स्थापनेनंतर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पुढील रणनीती आणि खाते वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता. तसेच, बंडातील अनेक आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते आषाढी एकादशीला शासकीय पूजा करण्यासाठी ते पुण्याहून पंढरपूरसाठी रवाना होतील.

शिंदे यांना गटनेतेपदी कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती या बाबींना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्याचा आव्हान देणारी शिवसेनेची याचिका आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या नोटिसा यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै सुनावणी होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय