Friday, November 22, 2024
Homeग्रामीणसततच्या हवामान बदलामुळे बळीराजा हतबल

सततच्या हवामान बदलामुळे बळीराजा हतबल

कळवण / सुशिल कुवर : दिंडोरी, कळवण, सुरगाणा, बागलाण तालुक्यात मागील पाच दिवसापासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणमुळे काहि ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. द्राक्षबागासह नुकतीच पेरणी झालेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच कांद्याची रोपांच्या पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण आहे. शेतकरी वर्गाकडून पिकांना रोगप्रतिबंध उपाय म्हणून पिकांना विविध प्रकारच्या फवारणीसाठी खर्चात वाढ झालेली दिसून येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात !

खरिप हंगामात सतत पडणार्‍या पावसामुळे व वातावरण बदलामुळे उत्पादनात चालू वर्षी मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे बळीराजा हतबल असतानां पुन्हा एकदा शेतकरी वर्गासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. या वातावरणामुळे द्राक्षशेती धोक्यात आली असून द्राक्षाला विविध रोगाचा सामना करावा लागत आहे. पाच दिवसापासून या तालुक्यात रिमझिम पडणार्‍या पाऊसाच्या सरीमुळे द्राक्षबागावर डावणी, भुरी, लाल कोळी, मिलीबग यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

फ्लोरा अवस्थेत असणार्‍या बागामध्ये कुजेचे व गळीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यांचप्रमाणे वातावरणात सतत गारवा असल्यामुळे आरली छाटणी झालेल्या द्राक्षबागामध्ये द्राक्षमणी कडक होऊन द्राक्षमण्यानां तडे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे द्राक्षउत्पादकडून द्राक्षबागाच्या सुरक्षितेसाठी विविध प्रकारच्या फवारण्या घेण्याचे काम चालू आहे.

द्राक्षपिक वाचविण्यासाठी खर्चात मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. 

द्राक्षाचा जिल्हा म्हणून नाशिक मधील प्रसिद्ध असलेल्या निफाड, दिंडोरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. हाततोंडाशी आलेला पीक बाजारात व्यवस्थित जाणार का, याचीच चिंता आता सतावत आहे.

कळवण तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू व हरभरा र्‍यांची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. मात्र ढगाळ वातावरण व अचनाक पडणार्‍या पावसामुळे पेरणी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे पेरणी करून झालेल्या गहू, हरभरा पिकांवर मावा, करपा, तांबेरा व आळीचा प्रादुभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पेरणीला शेतकरी वर्गाकडून ब्रेक देण्यात आल्यांचे चित्र दिसत आहे. चालू वर्षी बळीराजा निसर्गापुढे पूर्णपणे हतबल झाल्यांचे दिसत आहे वारवांर वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढून उत्पादनात घट होत आहे. कायमच पिकांना वाचविण्यासाठी भाडवंल कसे उभे कारायाचे असा प्रश्न सध्या उभा राहिला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय