Homeguard Salary : राज्यातील 55,000 होमगार्डसाठी आनंदाची बातमी आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने होमगार्डच्या मानधनात जवळपास दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.आणि हे होमगार्डचे मानधन देशातील सर्वात जास्त मानधन असून, विविध भत्तांची रक्कम देखील दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
होमगार्डच्या मानधनाबाबत काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु आज दसऱ्याच्या दिवशी होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे.नवीन मानधन आता 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे, ज्यामुळे राज्यातील होमगार्डसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
या निर्णयानुसार, होमगार्डचे प्रतिदिन मानधन 570 रुपयांवरून 1083 रुपये करण्यात आले आहे, जे देशातील सर्वाधिक मानधन ठरले आहे. यासोबतच उपहार भत्ता 100 रुपयांवरून 200 रुपये, तर भोजन भत्ता 100 रुपयांवरून 250 रुपये करण्यात आला आहे. या सुधारित भत्त्यांचा लाभ होमगार्डसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. (Homeguard)
सरकारने या निर्णयासाठी 552.7120 कोटी रुपये मंजूर केले आहेत, आणि दरवर्षी 795.7120 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील महिन्यात राज्यात 11,207 होमगार्डची भरती करण्यात आली होती, ज्यांचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे.
Homeguard
दसऱ्याच्या निमित्ताने या घोषणेसह राज्यातील होमगार्डना सरकारकडून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.
हेही वाचा :
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!