Monday, May 20, 2024
HomeNewsनायफड सोशल फाऊंडेशन च्या वतीने गावातील प्रत्येक शाळेला वाॅटर फिल्टर चे वाटप

नायफड सोशल फाऊंडेशन च्या वतीने गावातील प्रत्येक शाळेला वाॅटर फिल्टर चे वाटप

खेड : नायफड गावातील तरुण सहकार्‍यांच्या विचारातून तयार झालेल्या “नायफड सोशल फाऊंडेशन” यांच्या वतीने नायफड गावातील, जिल्हा परिषद शाळा धाबेवाडी, सरेवाडी, नाव्हाचीवाडी, खडकवाडी आणि गावठाण या सर्व शाळांना फाऊंडेशन चे सर्व सभासद, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे भेट दिली. नायफड सोशल फाऊंडेशन च्या वतीने प्रत्येक शाळेला वाॅटर फिल्टर भेट देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी नायफड सोशल फाउंडेशन चे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत सरपंच उषाताई फलके, त्यांचे सदस्य रोहिदास भाईक, सुनील मिलखे,स्वाती धोंडू ठोकळ, अलका भाईक व अखिल भारतीय किसान सभा नायफडचे मारुती शिंदे, सखाराम जोशी आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय