Thursday, July 18, 2024
Homeजिल्हासंघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन

संघर्षयोध्दा पुरस्कार वितरण व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन

जुन्नर /आनंद कांबळे :  नाशिक येथील प्रसिद्ध डाँक्टर संजय दामू जाधव यांच्या मातोश्री तुळसाबाई दामू जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने संघर्ष योध्दा पुरस्कार व सालदार आणि त्यांचे वारस या पुस्तिकाचे प्रकाशन येत्या १२डिसेंबर रोजी म्हसरुळ (नाशिक) येथे होत आहे.

प्रा. धम्ममसंगिनी रमागोरख ( विभाग प्रमुख, महिला विकास प्रमुख  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर ) यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

भगवान ठाकरे

संघर्ष योध्दा पुरस्कार भगवान ठाकरे (परिवर्धा ता.शहादा जि.नंदूरबार ) यांना देण्यात येत आहे, ठाकरे गेली ५०वर्षे सालदार म्हणून काम करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापित लोकांच्या विरोधात पँनेल उभे करुन निवडून आणले.म्हणून विरोधकांनी त्याचा एक हात व एक पाय तोडला.

तरीसुद्धा न घाबरता ते आदिवाशी व आंबेडकर जनतेचे संघटन व कबीरांचे दोहे म्हणून समाजप्रबोधन करत आहेत असे डाँ.संजय जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय