Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

वृद्धी फाउंडेशन घोडेगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

---Advertisement---

---Advertisement---

घोडेगाव,(दि.१५ ) :  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  सामाजिक बांधिलकीच्या नात्याने  वृद्धी फाउंडेशन घोडेगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडेकरवाडी तसेच जिल्हा परिषद शाळा आपटी तालुका आंबेगाव येथील पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन  चित्रकला साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रणय दरंदळे तसेच उपाध्यक्ष नितेश काळे , हर्षदा काळे मुख्याध्यापक अशोक मध्ये ,सरपंच उपसरपंच गंगापूर खुर्द   उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा गाडेकरवाडी येथील शिक्षकांच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने  वृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्थानिक संयोजन नव्याने स्थापन झालेल्या आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles