Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहराच्या विविध भागांमध्ये किराणा किटचे...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहराच्या विविध भागांमध्ये किराणा किटचे वाटप

 औरंगाबाद (प्रतिनिधी) :- काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना  लॉकडाउनच्या काळामध्ये जशी मदत केली होती,  त्याच प्रमाणे राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टंसिंग पाळून गरजूंना मदत करण्याचे मार्गदर्शन राज्याचे ऊर्जामंत्री मा.डॉ. नितीनजी राऊत यांनी केले होते.

     त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज औरंगाबाद येथील भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनी या परिसरामध्ये किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट आणि शहर उपाध्यक्ष किशोर सरोदे ,चव्हाण सर आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागांमध्ये किराणा किट वाटपाचा कार्यक्रम सलग ८ दिवस चालणार असल्याचे डॉ. अरुण शिरसाट यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय