पुणे : खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने शेल पिंपळगाव येथे अनाथ आश्रमास वह्या पेन शालेय उपयोगी वस्तू व फळे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी राजे मोहिते, शेल पिंपळगाव चे सरपंच विद्याताई मोहिते, शेलगाव चे सरपंच रंजीत हांडे, ग्राम पंचायत सदस्य संदीप मोहिते, सुनिता मोहिते, नितीन मोहिते, माजी सरपंच संजय मोहिते, संजय थोरवे सोशल मिडिया अध्यक्ष विलास मोहिते, श्रेयस झोडगे, ऋषिकेश पानसरे, भरत पोतले, शुभम वर्हाडी, विशाल भुजबळ, प्रणव हांडे, माजी चेअरमन विलास मोहिते, जगदंब प्रतिष्ठान चे सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.