Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणमाजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची वाटप

माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची वाटप

जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : वडगाव सहाणी येथील माजी विद्यार्थी संघटना वडगाव सहानी यांच्या वतीने जि प शाळा वडगाव सहाणी, जि प शाळा शिंदेमळा, अंगणवाडी वडगाव सहाणी गावठाण, शिंदेमळा व क्रांतिवीर उमाजी नाईक वस्ती यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप सरपंच सौ वैशालीताई तांबोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यामध्ये वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, तेलखडू, चित्रकला वह्या, सुलेखन वह्या, पॅड वाटप करण्यात आले. याप्रसंगी वडगाव सहाणी गावच्या आदर्श सरपंच वैशाली भाऊसाहेब तांबोळी, माजी उपसरपंच खंडेराव विश्राम शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष हंबीर वाबळे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अरुण तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश महाराज वाबळे, उपाध्यक्ष अमोल तांबोळी, शैलेश वाबळे, मंगेश वाबळे, युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील शिंदे, युवा उद्योजक मदन वाबळे, गणेश मंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, मच्छिंद्र तांबोळी, विजय तांबोळी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गणेश तांबोळी, निलेश सोनवणे, जयेश वाबळे, संतोष तांबोळी, कल्याणी वाबळे, संगीता शिंदे, संगीता चव्हाण, अंगणवाडी शिक्षिका निता वाबळे, स्वाती तांबोळी, चंदा चव्हाण, शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी केले तर आभार बाळासाहेब बांबळे यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय