Monday, May 20, 2024
Homeजुन्नरमाजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

जुन्नर : माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहान मुलांना वह्या, पेन, खाऊचे वाटप करण्यात आले.

जुन्नर तालुका प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूप व बेघर महीला ग्रूपच्या वतीने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्यालयात लहान मुले व सर्व पदाधिकारी व दिव्यांग बांधवांच्या उपस्थित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी लहान शालेय मुलांना वह्या व पेन खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष अरूण शेरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनिल जंगम, सौरभ मातेले, ऋतिक शेटे, बेघर महीला संघटना च्या अध्यक्षा नफिसा इनामदार, शमिम सय्यद, अशोक घोटणे, संतोष शेरकर, गणेश रासकर, राज फाउंडेशन चे अध्यक्ष श्रीकांत जाधव, विजय शेळके, गणेश शेटे, सचिन वाव्हळ, सचिन जाधव, मुस्तकिम पीरजादा, मजहर सौदागर, रवींद कुटे, अहेमद खान, नाझिया इनामदार, शाहीण इनामदार, गायत्री गिरी व महिला व बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय