Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरखटकाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ चे वाटप 

खटकाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ चे वाटप 

जुन्नर : खटकाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, इलेक्ट्रॉनिक फायनान्स लिमिटेड व वुई टुगेदर फाऊंडेशन, श्री स्वामी समर्थ केंद्र, चिखली प्राधिकरण च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या, पेन, खाऊ चे वाटप देण्यात आले.

यावेळी वुई टुगेदर फाऊंडेशन चे नवनाथ मोरे, एसएफआय चे राजू शेळके, अक्षय साबळे, किसान सभेचे लक्ष्मण जोशी, सरपंच बाळू केदारी, माजी सरपंच रामदास झाडे, काशिनाथ भवारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राजू शेळके म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि शिक्षण घेणे सुकर व्हावे, यासाठी संस्थांच्या योगदानातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे.

यावेळी नवनाथ मोरे, विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, व आपल्या गावाचे, शाळेचे, आई-वडिलांचे नांव मोठे करावे. संस्थांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत नक्कीच सार्थक ठरेल.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास मोरे, प्रकाश भवारी, ग्रामसेवक वारे भाऊसाहेब, मारुती मोडक, गोपाळ मोरे, योगेश मोडक, सुरज बांबळे, अक्षय साबळे, शितल भवारी, शिक्षक शिवाजी माळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उल्का मोरे यांनी केले, तर आभार शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सीताराम गागरे यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय