Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणफुलवडे येथील आश्रमशाळेत ११ हजार ५०० वह्यांचे वाटप

फुलवडे येथील आश्रमशाळेत ११ हजार ५०० वह्यांचे वाटप


फुलवडे ( ता . आंबेगाव ) :
 फुलवडे ( ता . आंबेगाव ) येथील नामदेवराव मारुती नंदकर अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला चाकण येथील आस्था फाउंडेशनकडून ११ हजार ५०० वह्यांचे वाटप करण्यात आले .

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आपल्या संस्थेकडून मदत व्हावी या उद्देशाने वह्यांचे वाटप केले असल्याचे याप्रसंगी तेजस मुंगसे यांनी सांगितले . कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आसपासच्या विद्यार्थ्यांना बोलावून व कोरोनाचे नियम पाळत काही विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप शाळा सुरू झाल्यानंतर करण्यात येईल , असे मुख्याध्यापक सुनील पोटे यांनी सांगितले . या प्रसंगी आस्था फाउंडेशनचे संजय टोपे , सचिन थेऊरकर , किशोर तळपे , हृषिकेश देवकर , ज्ञानदीप संस्थेचे संस्थापक नामदेवराव नंदकर , सूरज नंदकर ,  मुख्याध्यापक सोपान फटांगरे , खंडू कारंडे , महेश डुंबरे आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

लोकप्रिय