Friday, December 27, 2024
Homeग्रामीणधारूर : २०२० चा पिक विमा भेटण्यासाठी शेतकरी आंदोलनाला तयार - अॅड...

धारूर : २०२० चा पिक विमा भेटण्यासाठी शेतकरी आंदोलनाला तयार – अॅड अजय बुरांडे

धारूर : धारूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० चा पिक विमा भेटावा यासाठी परळी येथे पिक विमा परिषद होणार आहे. या तयारीसाठी धारूर येथे किसान सभेच्या वतीने अॅड संजय चोले यांच्या अध्यक्षते खाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे युवा नेते अॅड अजय बुराडे हे उपस्थित होते. 

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० चा पिक विमा भेटला पाहिजे यासाठी दि. २७ जुलै २०२० रोजी परळी येथे पिक विमा परिषद होणार आहे. त्याची तयारी म्हणुन प्रत्येक तालुक्यात किसान सभेच्या वतीने धारूर येथे बैठकाचे आयोजन केले आहे. या बैठकीला मार्गदर्शक म्हणुन किसान सभा जिल्हा अध्यक्ष कॉ. मोहन लांब, किसान सभेचे युवा नेते कॉ अॅड अजय बुरांडे, यांनी असे सांगितले कि २०१८ चा पिक विमा भेटण्यासाठी किसान सभेच्या वतीने आंदोलन केले होते, त्याच्या पेक्षा ही जबरदस्त आंदोलन करून २०२० पिक विमा भेटेल. यावेळी ११ गावातील २७ किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते, परळी येथील पिकविमा परिषदेसाठी १०० शेतकरी जाणार आहेत. तसेच, यावेळी मार्गदर्शन करताना संघर्ष केल्यावर १००% पिक विमा भेटेल, असे डॉ. अशोक थोरात म्हणाले.

या बैठकीला किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ काशिराम सिरसट, पप्पु तांबुरे, मोहन आदमाने, दादा सिरसट, भास्कर सिरसट, बाळासाहेब पंचभाई, कृष्णा बोबडे यांसह इतर कार्यकर्तें हजर होते.

संबंधित लेख

लोकप्रिय