Friday, December 27, 2024
Homeजिल्हाशासनाने लेखी आश्वासन देवूनही आदिवासी बांधवांना हिरडा नुकसान भरपाईची रक्कम नाहीच…

शासनाने लेखी आश्वासन देवूनही आदिवासी बांधवांना हिरडा नुकसान भरपाईची रक्कम नाहीच…

पुणे : निसर्ग चक्रीवादळात आदिवासी बांधवांचे उपजिवीकेचे साधन असलेल्या हिरडा या वनउपजाचे मोठे नुकसान झाले. किसान सभेच्या मागणीनंतर प्रशासनाने हिरडा नुकसानीचे पंचनामे केले. परंतु अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही.

किसान सभेने सातत्याने हिरडा नुकसानीच्या भरपाई मिळण्यासाठी आंदोलन, मोर्चे करत प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले‌. परंतु सरकार फक्त आश्वासनावर आश्वासनाने देत आहे.

अकोले ते लोणी असा किसान लॉन्ग मार्च किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघाला आणि हजारो हिरडा उत्पादक शेतकरी त्यामध्ये सहभागी झाले. राज्य सरकारने यावेळी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही.

यावर किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अमोल वाघमारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. डॉ. वाघमारे म्हणतात, “राज्य शासनाने लेखी आश्वासन देवूनही, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांना हिरडा नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळाली नाही.. आम्ही, तर चिवटपणे लढत राहूच पण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या प्रश्नांवर तोंड उघडणार की नाही..???

शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर पंचनामे करण्याचे आदेश द्यायचे, व तात्पुरती वेळ मारून न्यायची. मात्र नुकसान भरपाई मिळू अथवा न मिळू मग मात्र हाताची घडी तोंडावर बोट….” असा संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

उर्फी जावेदचा नवा टोमॅटो लूक पाहिलात का ? ज्याची होतेय जोरदार चर्चा

ब्रेकिंग : पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट आली समोर

ब्रेकिंग : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात नवीन अपडेट

विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता, ‘युपीए’ ऐवजी असेल ‘हे’ नाव

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

नोकरीच्या अधिक बातम्या वाचा :

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM : चंद्रपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NHM : यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आज करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय