Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभाजप खासदार ब्रिजभूषण विरोधात पुण्यात निदर्शने , खेळाडूंना जाहीर पाठिंबा

भाजप खासदार ब्रिजभूषण विरोधात पुण्यात निदर्शने , खेळाडूंना जाहीर पाठिंबा

पुणे : ऑलम्पिक मध्ये भारताचं नाव उंचीवर नेणाऱ्या व अनेक स्पर्धांमध्ये मेडल जिंकून देणाऱ्या महिला कुस्तीपटू यांच्या आत्म सन्मानासाठी गेल्या कित्येक दिवसापासून दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. मोदी सरकार एका बाजूला बेटी बचावच्या घोषणा करते पण प्रत्यक्षात या बेटीच्या वाटेला उपेक्षाच आहे. हे सरकार डोळे असून आंधळ आहे व कान असून बहिर आहे अस परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी मांडले.निमित्त होते क्रीडा प्रेमी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, पुणे शहर युवक काँग्रेस व लोकायत आयोजित केलेल्या निदर्शनाचे.



आमच्या ऑलम्पिक पदक विजेत्या व सर्व खेळाडूंसोबत एकजुटीने उभे राहण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी गुडलक चौकात हे निदर्शन झालं. खेलांडूच शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण याला तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे, साक्षीला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मारुती हाडकर ऑलिंपिक सहभागी झालेले 1972 चे खेळाडू, मामासाहेब मोहळ तालमीतले कुस्तीगीर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गोपाल तिवारी, शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष संगीता तिवारी, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिरसाठ, लोकायतचे निखील रांजणकर, शुभम हल्ले सहभागी झाले होते.युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी आभार मांडले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय