Friday, November 22, 2024
Homeराजकारणमालाडमध्ये झोपडपट्ट्या पाडण्याचे काम सुरु, आमदार भातखळकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मालाडमध्ये झोपडपट्ट्या पाडण्याचे काम सुरु, आमदार भातखळकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मालाडच्या कुरार भागात मेट्रोच्या कामासाठी झोपडपट्ट्या पाडण्याचं काम सुरु करण्यात आले आहे. या कारवाईवर स्थानिक नागरिक संतापले असून या कारवाईला विरोध केला जात आहे. येथील भाजप आमदार अतुल भातखळकर यांना या कारवाई बाबत समजताच तिथे दाखल झाले आहे.

कुरार मेट्रो स्टेशनच्या उभारणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यावेळी वनराई पोलिसांनी आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय