Friday, November 22, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ दाखविल्याने लोकशाही चॅनेल 72...

मोठी बातमी : किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ दाखविल्याने लोकशाही चॅनेल 72 तासांसाठी बंद

मुंबई : गेल्या काही दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लिल व्हिडिओ समोर आला होता. या संदर्भातील बातमी लोकशाही मराठी या न्यूज चॅनलने दाखविली होती. यावरून आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने माध्यमांची गळचेपी असल्याची टीका केंद्र सरकारवर केली जात आहे.

किरीट सोमय्यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून नोटीस आली होती. या नोटीसीला उत्तरही देण्यात आलेले होते. आम्हाला पुढील 72 तास चॅनेल बंद करण्याच्या सूचना आलेल्या आहेत. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 72 तासांसाठी लोकशाही चॅनेल बंद करण्यात आलेलं आहे. सूचनांचे आम्ही पालन करुच, पण, आमची बाजू ऐकून घेण्याची अपेक्षा होती. अद्यापही या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु, आम्हाला थेट शिक्षा सुनावल्याचा एक प्रकार आहे. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, अशी माहितीही कमलेश सुतार यांनी दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय