लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित.
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील नगरपरिषद मंजूर विकास आराखडा योजना दुसरी सुधारीत मधील आरक्षित जागेत आळंदी स्मशान भूमी विकसित करण्यासह विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा रिपब्लिकन सेनेचे वतीने जिल्हाध्यक्ष संदीप रंधवे यांनी आळंदी नगरपरिषदे समोर लाक्षणिक उपोषण सुरु केले. खेडच्या तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक यांचे समवेत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संवाद साधून मागण्यांचे बाबतीत स्वतंत्र बैठक लावण्याची ग्वाही उपोषणकर्ते संदीप रंधवे आणि सहकारी यांना लेखी दिल्याने तूर्त उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे वतीने कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, नगर अभियंता संजय गिरमे यांचे हस्ते लेखी ग्वाहीचे पत्र देण्यात आले. समाजसेवाज अण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आळंदी शहर अध्यक्ष अर्जुन मेदनकर, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संघटक चेअरमन पै. बाळासाहेब चौधरी, अनिल शिंदे, आनंद गंगावणे, सुयोग कांबळे,अजय गायकवाड, रवींद्र गायकवाड, रवींद्र रंधवे, सिध्दार्थ रंधवे, उषा वाघमारे, उषा शिंदे, सुलतान शेख, भाऊसाहेब दनाने, विश्वजीत थोरात, सागर खळसोंडे, अमित गडदे, उमेश रानवडे, सुयोग कांबळे, दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके, जनहित फाउंडेशनचे विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, संदीप साळुंखे, दत्ताभाऊ गायकवाड आदींनी उपस्थित राहून उपोषणास पाठींबा दिला.
तीर्थक्षेत्र आळंदी विकास योजना दुसरी सुधारित मंजूर आणि यापूर्वी पासून आळंदी येथील स्मशान भूमीचे आरक्षण ज्या जागेत आहे. त्या ठिकाणी प्रभावीपणे आणि प्राधान्याने विकसित करण्यात यावी. सद्या लोकवस्तीत असलेल्या या स्मशान भूमीमुळे लगतच्या लोकांना त्रास होत आहे. आणि बस स्थानक शेजारी तसेच मंजूर डी. पी रोड मध्ये स्म्शान भूमी तात्पुरत्या स्वरूपात आहे. यामुळे आळंदी नगरपरिषद मंजूर डी. पी. मधील आरक्षण ज्या ठिकाणी आहे. त्या आरक्षित जागेत तात्काळ स्मशान भूमीचा विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. यासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिलेल्या पत्रा प्रमाणे लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून प्रशस्त जागेवर अत्याधुनिक स्मशान भूमी विकसित करण्यात यावी. सद्याचे स्मशान भूमीमुळे प्रवासी, यात्रेकरू, नागरिक यांना धुराचा त्रास होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. तसेच लगत आळंदी ग्रामीण रुग्णालय, लहान मुलांची शाळा, लोकवस्ती असल्याने तात्काळ स्मशान भूमीचा येथील वापर बंद करून आरक्षित जागेत स्मशान भूमी विकसित करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागणी साठी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे यांचे नेतृत्वात लाक्षणिक उपोषण लक्षवेधी म्हंणून करण्यात आले.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मध्ये तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात भाजी मंडई स्थलांतरित करण्याचे बाबतीत बोलविण्यात आलेली बैठक. यात सर्व्हे क्रमांक ३ मूळ मालक म्हंणून भाजी मंडईत ३० टक्के गाळे उदरनिर्वाहासाठी देणेचे मागणीस विलंब झाल्याने लवकरात लवकर सदर ठिकाणी गाळे उपलब्द्ध करून देणे, चौपाल ही इमारत ज्या कारणासाठी विकसित करण्यात आली आहे. त्याच साठी वापर करणे बाबत मागणी कडे दुर्लक्ष झाले असून विकसित कारणासाठी वापरकरावा, आळंदी विकास योजना मंजूर दुसरी सुधारित विकास आराखडा यात ज्या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशान भूमी साठीचे भूसंपादन करून स्मशान भूमीचे विकास काम हाती घेण्यात यावे. आळंदी इंद्रायणी नदी लगतचा बस स्थानकातून दक्षिणेकडे जाणारा डी.पी. रोड तात्काळ विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करून मूळ मालकांना नुकसान भरपाई रेडीरेकनर चालू बाजार भावाचे पाच पट मोबदला देण्यात यावा. इनाम वर्ग ३ च्या जागा परस्पर नगरपरिषदेने आपल्या ताब्यात ठेवलेल्या मूळ मालकांना तात्काळ परत देण्यात याव्यात या मागण्याचा समावेश असल्याचे यावेळी संदीप रंधवे यांनी सांगितले.
लेखी ग्वाही पात्रात आळंदीत प्रशासक राजवट असल्याने मागण्यांवर प्रशासक, नगरपरिषद आळंदी तथा तहसीलदार खेड यांच्या माध्यमातून बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यासाठी तारीख करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच लेखी पत्र दिल्याने लाक्षणिक उपोषण मागे घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन केल्याने उपोषण तूर्त स्थगित करून मागे घेत असल्याचे संदीप रंधवे यांनी सांगितले. यावेळी उपोषणकर्ते संदीप रंधवे म्हणाले, स्मशान भूमीतील संबंधित काम जैसे थे ठेवण्यास सांगितले.