Friday, May 3, 2024
Homeजिल्हापंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी वेळेची मागणी; राजू देसलेंना पोलिसांची नोटीस

पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी वेळेची मागणी; राजू देसलेंना पोलिसांची नोटीस

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पंतप्रधानांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी वेळेची मागणी केलेल्या आयटकचे नेते राजू देसले यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.इपीएस 95 पेंशनर, आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी, कंत्राटी कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, अंशकालीन स्री परिचर, शेतकरी कांदा निर्यात बंदी निर्णय रद्द करा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी 1 हजार कोटी रुपये शेअर्स भाग भांडवल गुंतवणूक केंद्र सरकारने करून आशिया खंडातील सर्वात मोठी शेतकऱ्यांची बँक वाचवावी या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी वेळ वेळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.

याबाबत बोलताना राजू देसले म्हणाले, याकरिता जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन, पत्र दिले होते. काल नाशिक पोलिस आयुक्त नाशिक यांनी बोलवलेल्या बैठकीत ही नाशिक जिल्हातील शेतकरी, कामगार संघटनांना भेटीसाठी पंतप्रधानांनी वेळ द्यावा. यासाठी विनंती केली होती. मात्र, आज पोलिस आयुक्त नाशिक कार्यालयाने सीआरपीसी 149 ची नोटीस बजावली आहे. याचा आम्हीं निषेध व्यक्त करतो, असेही देसले म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांना रोड शो साठी वेळ आहे. मात्र, शेतकरी, कामगार प्रश्न साठी वेळ नाही. ही खेदाची बाब आहे. संविधानिक मार्गाने शेतकरी, कामगार लढा सुरूच राहील.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय