वैभव छाजेड यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:शहरात महिलांचे नोकरी व्यवसायामध्ये मोठे प्रमाण आहे.मागील पाच वर्षात स्मार्ट सिटीचा विकास आराखडा राबवण्यासाठी स्थापत्य विभागाने स्वछ भारत अभियाना अंतर्गत विविध सोयीसुविधा तसेच रस्ते विकासाची कामे केली,मात्र शहरातील विविध ठिकाणी आवश्यक महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महिला स्वछतागृहे पुरेशी बांधलेली नाहीत.
सार्वजनिक ठिकाणी वावर करताना महिलांची मोठया प्रमाणात कुचंबणा होत असते.त्यामुळे फेर सर्वेक्षण करून नवीन प्रशस्त महिला स्वछतागृहे नव्याने बांधावीत,त्याठिकाणी आवश्यक त्या सेवा महिलांना उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते वैभव छाजेड यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे एका निवदनाद्वारे मागणी केली आहे.