टेक्सास : आयटी क्षेत्रात मोठी मंदी सुरू असून जगभर मागील वर्षभरात अनेक आय टी कंपन्यांनी कामगार कर्मचारी कपात सुरू केली आहे. आर्टिफिशियल इंटलीजेंस (AI) मुळे अनेक कंपन्या विविध पुनर्रचना करत आहेत, त्यामुळे आस्थापनांमध्ये अतिरिक्त आणि खर्चिक बाबींना फाटा देण्याचे कंपन्यांचे धोरण सुरू आहे. (Dell layoff)
यासाठी जगप्रसिद्ध Dell कंपनीने १२,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
संगणक आणि संगणकाशी संबंधित वस्तूंचे उत्पादन करणार्या अमेरिकन डेल टेक्नोलॉजीस्ट या कंपनीने मागील १५ महिन्यांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपात केली आहे. यावेळी कंपनीने सुमारे १२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
कंप्यूटर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Dell ने आपल्या विक्री विभागाची मोठी पुनर्रचना जाहीर केली आहे. या पुनर्रचनेच्या अंतर्गत कर्मचार्यांची कमी केली जाईल.
या कंपनीला बिझिनेस ऑपरेशन्स आधुनिक बनवण्यावर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. कंपनीने ६ ऑगस्ट रोजी कर्मचार्यांना तसे अधिकृत कळवले आहे.
यानुसार कंपनीच्या विक्री (sales) विभागातील या मुख्यत: व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. यातील बरेचसे कर्मचारी दोन दशकांपेक्षा जास्त वर्षे कंपनीच्या सेवेत आहेत. (Dell layoff)
Dell Technologies एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे, १८० देशांत कार्यरत आहे आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर, आणि सेवा क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय आहे.
डेल टेक्नोलॉजीस्ट मध्ये फेब्रुवारी २०२४ पर्यंत १२०,००० कर्मचारी आहेत, त्यातील किमान १० टक्के कर्मचारी टप्याटप्प्याने कमी केले जाणार आहेत.