Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिंचवडगावात रांगोळीमय १७०० दिवे लावून दीपोत्सव व प्रदूषणमुक्त दिवाळी संदेश

चिंचवडगावात रांगोळीमय १७०० दिवे लावून दीपोत्सव व प्रदूषणमुक्त दिवाळी संदेश

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : ‘गोखले वृंदावन हाऊसिंग सोसायटी’ चाफेकर चौक, चिंचवडगाव येथील सोसायटीमध्ये संध्याकाळी १७०० पणत्या लावून व संकुलातील गणेश मंदिरासमोर भव्य रांगोळी काढून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संकुलातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एक एक पणती लावून सहभाग नोंदविला.

यावेळी भव्य पणत्यांमधून सुंदर चित्र निर्माण झाले. रांगोळीमय दीपोत्सवाची संकल्पना अथर्व देसाई, सुखदा कुलकर्णी, विनायक तळवलकर, मृणालीनी सरदार, योगेश देशपांडे, अथर्व देसाई यांनी साकार केली. भव्य रांगोळी, मयुरी आढाव यांनी काढली. किरण येवलेकर, अतुल आंबेकर, भूपेंद्र केतकर आदी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सभासद आणि प्रदूषण मुक्त दिवाळीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय