Saturday, April 20, 2024
Homeराज्यमाजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुणे : शिवसेनेचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

विनायक निम्हण यांनी बुधवारी दुपारी कुटुंबियासमवेत पाडवा कार्यक्रम साजरा केला. मात्र, त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर रात्री नऊ वाजता पाषाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विनायक निम्हण हे शिवसेनेच्या तिकिटावर ते दोनदा तर काँग्रेसच्या तिकीटावर एकदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते कट्टर नारायण राणे समर्थक म्हणूनही ओळखले जात. राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ निम्हण यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

विनायक निम्हण १९९९ मध्ये पहिल्यांदा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातुन आमदार झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले. त्यानंतर त्यांच्याकडे पुणे शिवसेना शहर प्रमुखांची जबाबदारी देण्यात आली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय