Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडइंद्रपुरीतील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार शेळके यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

इंद्रपुरीतील अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी, आमदार शेळके यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

तळेगाव दाभाडे / क्रांतिकुमार कडुलकर (दि.11 ) : इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते रविवार (ता.11) करण्यात आले. जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या इंद्रपुरी कॉलनीत 110 भूखंड आहेत. यामध्ये 13 रहिवासी सोसायट्या असून 35 भूखंडावर फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल, कंपन्या आहेत. इतर 11 ठिकाणी विविध कामे सुरु आहेत. येथील रहिवासी सोसाट्यांमधील सुमारे दोनशे सदनिकांमध्ये सुमारे दोन हजार नागरिक राहत आहेत.

मागील सहा वर्षांपासून हे रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित होते. येथील रहिवाशांच्या समस्यांकडे प्रशासन व बिल्डर्स यांनी डोळेझाक केल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.सोसायटी धारकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कॉलनीतील बंदिस्त गटार बांधणे तसेच सुमारे एक कोटी वीस लक्ष निधीतुन ग्रीन व्हीव सोसायटी ते साईसिद्धी सोसायटी रस्ता, अपेक्स सोसायटी ते बोध क्लासिक सोसायटी रस्ता, महामार्ग ते लक्ष्मी सोसायटी रस्ता, हॉटेल थंडा मामला मागे इंद्रपुरी सोसायटी रस्ता, ग्रीन व्हीव ते प्रथमा हाईट्स सोसायटी रस्ता, अपेक्स सोसायटी ते लक्ष्मी आंगण सोसायटी रस्ता, महामार्ग ते अपेक्स सोसायटीकडे जाणारा रस्ता अशा एकूण सात रस्त्यांची कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत. “सोसायटी धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मागील दोन वर्षांत इंद्रपुरी कॉलनीतील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावू शकलो,याचे समाधान आहे.”- आमदार सुनिल शेळके या कार्यक्रमास महेश शेंडकर, उद्योजक निलेश राक्षे, चंद्रकांत दाभाडे, गणेश थिटे, नारायण मालपोटे तसेच सोसायटीतील रहिवासी नागरिक उपस्थित होते.

हे ही वाचा :

ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी

बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय